Do like share and comment your thoughts below in comment section. For more such IGTV videos on mobile photography do check om’s Instagram profile @shutter.khol
पेटणारा प्रत्येक दीप हा आपल्या अंतःकरणातील प्रत्येक कोपरा उजळवून टाकतो.. अंधार …मनातला जनातला ….समाजातला… अंधारात राहणं म्हणजे चाचपडत राहणं ..ज्याला असा अनुभव येतो त्याच्यासाठी हा अंधार अत्यंत वेदनादायी असतो. अंधार……. कधी तो क्षणासाठी असतो तर कधी जीवनभर असू शकतो. अंधाराची व्याप्ती अशी अनाकलनीय आहे.प्रकाश…. उजेडच तो… त्याचा एक जरी किरण अंधारावर पडला तर घनघोर अंधार नष्ट करण्याची ताकद .,,शक्ती त्या एका किरणांमध्ये सुद्धा असते…सगळीकडे पसरलेला अंधार एका दिव्याच्या ज्योतीने चटकन दूर होतो. प्रकाशाचं सामर्थ्य असं अतुलनीय आहे. आपण दीपावलीचा सण साजरा करीत असताना हा प्रकाशाचा सण आपल्याला उजळवून सुशोभित करत राहील असा प्रयत्न आपण ह्या निमित्ताने करू या.
“When he shall die, Take him and cut him out in little stars, And he will make the face of heaven so fine That all the world will be in love with night And pay no worship to the garish sun.” ― William Shakespeare, Romeo and Juliet